Maharashtra Weather Update: देशात पुन्हा एकदा पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. विशेषता पश्चिम भागात मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याने पावसाची (Monsoon News) शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवलेल्या आपल्या 15 ऑगस्ट पर्यंतच्या हवामान अंदाजानुसार, देशात मान्सूनच्या अनेक प्रणाली सक्रिय आहेत आणि त्यांच्या प्रभावाखाली मध्य प्रदेश, आग्नेय राजस्थान, गुजरातमधील सौराष्ट्र, कच्छ आणि महाराष्ट्रातील कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते, मान्सूनच्या या दुसर्या चरणात यूपी, बिहारसह ईशान्येकडील भागात पावसाचा जोर कमी राहणार आहे. मात्र असे असले तरी, IMD नुसार, 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
या कालावधीत आपल्या महाराष्ट्रात देखील पावसाची जोरदार बॅटिंग होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात 12 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.
याशिवाय छत्तीसगड, गुजरातच्या काही भागात मुसळधार पाऊस या कालावधीत कोसळणार आहे. पश्चिम मध्य प्रदेशात 15 ऑगस्ट आणि पूर्व मध्य प्रदेशात 14 आणि 15 ऑगस्टला अतिवृष्टीचा इशारा यावेळी भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यामुळे संबंधित राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा या वेळी देण्यात आला आहे.
या राज्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडू शकतो
हवामानाचा अंदाज वर्तवनारी खाजगी संस्था स्कायमेट (Skymet Weather Update) अनुसार, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दक्षिण-पूर्व आणि दक्षिण राजस्थान, गुजरातच्या काही भागांमध्ये काही ठिकाणी पुढील काही दिवस हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
पश्चिम बंगाल, ईशान्य भारत, लक्षद्वीप, अंतर्गत कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांमध्ये शक्य आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि उत्तर राजस्थानच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. मित्रांनो गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.