Maharashtra Weather Report : राज्यात 4 मार्चपासून सुरू झालेला पाऊस आता उघडीपं घेईल असं वाटतं होत होत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये विशेष समाधानाचे वातावरण होते. मात्र काल अचानक राजधानी मुंबई, ठाणे, रायगड परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली.
विशेष म्हणजे भारतीय हवामान विभागाबाबत या पावसाविषयी चेतावणी देण्यात आली नव्हती. परिणामी मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी रेल्वे प्रवास विस्कळीत झाला. दरम्यान आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आगामी ‘इतके’ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा हाय अलर्ट
आय एम डी ने जारी केलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. निश्चितच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकरी बांधवांचे रब्बी हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव छत्रपती संभाजीनगर सह विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान पाहावयास मिळत आहे.
या अवकाळी पावसाने आणि गारपीटीने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घासी राहून घेतला आहे. दरम्यान आता राज्यात पुढील चार दिवस पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार 25 मार्चपर्यंत अर्थातच शनिवार पर्यंत राज्यात पाऊस कोसळणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यातील कोणत्या जिल्ह्यात नेमका पाऊस पडेल याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- कापसाच्या दरात मोठी घसरण ! आता दरवाढ होणार का? पहा याविषयी तज्ञांचे मत
या जिल्ह्यात राहणार पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्यावत माहितीनुसार, राजधानी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे गुरुवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता कायमच आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे की आतापर्यंत कोकणात मुसळधार असा पाऊस पडला नव्हता मात्र आता कोकणातही पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण आज पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. याशिवाय शुक्रवारी आणि शनिवारी खानदेश मधील धुळे, नंदुरबार तसेच सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता राहणार आहे.
याशिवाय शनिवारी नाशिक, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, या जिल्ह्यात तोपर्यंत हलक्या सरीं बरसतील असाही अंदाज आहे. एवढेच नाही तर या चार दिवसांमध्ये अहमदनगर, जळगाव, पुणे या जिल्ह्यात अधून मधून पाऊस पडतच राहील असं नमूद करण्यात आल आहे. एकंदरीत भारतीय हवामान विभागाचा अंदाज पाहता 25 मार्च 2023 पर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी दिलासादायक ! शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्ग प्रकल्पाला मिळाली गती; 400 खांब तयार, केव्हा होणार पूर्ण काम?