Maharashtra Vihir Anudan : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. अनेकदा शेतकरी बांधवांना पाण्याअभावी अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी विहीर खोदण्याचा सल्ला दिला जातो. मात्र विहीर खोदण्यासाठी महागाईच्या काळात अधिक पैसा खर्च करावा लागतो.
यामुळे अल्पभूधारक शेतकरी बांधवांना विहीर खोदता येत नाही. दरम्यान महाराष्ट्र शासन अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी विहीर खोदण्यास अनुदान देते. मात्र अनुदान प्राप्त करण्यासाठी असणारी किचकट प्रक्रिया आणि नियम अनेकदा शेतकरी बांधवांसाठी त्रासदायक ठरतात. मात्र आता मागेल त्याला विहीर अनुदानात भरघोस वाढ करण्यात आले असून योजनेतील काही नियम देखील शिथिल झाले आहेत. मित्रांनो खरं पाहता पाण्याची उपलब्धता झाल्यास शेतकरी बांधवांना शेतीतून अधिक उत्पन्न मिळणे शक्य होणार आहे.
दरम्यान आता मागेल त्याला विहीर अनुदान किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे करताना अधीनस्त कार्यालयास येत असलेल्या अडचणी लक्षात घेता सिंचन विहिरी संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय शासनाकडून जारी करण्यात आला आहे. या सदर शासन निर्णयात काही मार्गदर्शक सूचना जरी झाल्या आहेत. या शासन निर्णयाच्या माध्यमातून विहीर अनुदानामध्ये असलेल्या काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
या प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार विहिरीच्या अनुदानाचा लाभ
•अनुसूचित जाती
• अनुसूचित जमाती
• भटक्या जमाती
• निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
• दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
• स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
• शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे
• जमीन सुधारणांचे लाभार्थी
• इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थीजे)
• अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006 (2007 चा 2) खालील लाभार्थी
• सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत भूधारणा)
•अल्प भूधारक (5 एकर पर्यंत भूधारणा)
अनुदानाचा लाभ घेण्यासाठी नवीन पात्रता
अ) लाभधारकाकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असावे.
ब) महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,
क) दोन सिंचन विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
1. दोन सिंचन विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
ड) लाभधारकाच्या ७/१२ वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
ई) लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. (Online)
(फ) एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असावे.
ग) ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.
विहीर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे लागणार आहेत
विहीर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे हेच शेतकरी बांधवांना 7/12 चा ऑनलाईन उतारा, 8 अ चा ऑनलाईन उतारा, जॉबकार्ड ची प्रत, सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा, सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र.