Maharashtra Vande Bharat Train : पुणे, अकोला, नागपूरसह संपूर्ण विदर्भवासियांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. विशेषता रेल्वे प्रवाशांसाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्राला लवकरच तीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
या तीन गाड्या नागपूर-भोपाळ, नागपूर-हैदराबाद आणि नागपूर ते पुणे या मार्गावर सुरू केल्या जाणार आहेत. अद्याप याची अधिकारीक घोषणा झालेली नाही. पण या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आतापर्यंत संपूर्ण देशभरात 25 वंदे भारत एक्सप्रेस कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
2019 मध्ये ही गाडी सुरू झाली आणि तेव्हापासून अवघ्या चार वर्षांच्या काळात 25 मार्गावर या हाय स्पीड ट्रेनला सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांचा या गाडीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशभरातील विविध महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी चालवण्यासाठी नियोजन आखले जात आहे. आता याच पार्श्वभूमीवर नागपूरहुन पुणे, भोपाळ आणि हैदराबादला वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
खरंतर या मार्गांसाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी सर्वे करण्यात आला आहे. यामुळे आता या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असे सांगितले जात आहे. याबाबत रेल्वेचे विभागीय आयुक्त तुषारकांत पांडे यांनी सांगितल्याप्रमाणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार की इतर ट्रेन याबाबतचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेतला जाणार आहे. यामुळे या तीन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणारच याबाबत आत्तापासूनच काहीही सांगता येत नाही.
पण पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहता या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकतात असे मत काही जाणकारांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. निश्चितच या तीन महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली तर रेल्वे प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार असून या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होण्यास मदत मिळणार आहे.