Maharashtra Vande Bharat Train : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. रेल्वे हे भारतातील प्रवासाचे एक मुख्य साधन आहे. बस, खाजगी वाहनांपेक्षा रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणार आहे.
शिवाय रेल्वेचे जाळे हे संपूर्ण देशात विस्तारलेले आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात प्रवास करायचा असेल तरीदेखील रेल्वे उपलब्ध होते. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास जलद गतीने होतो. अशा परिस्थितीत प्रवासासाठी सर्वप्रथम रेल्वेलाच प्राधान्य दिले जाते. रेल्वे कडून देखील रेल्वे प्रवाशांचा प्रवास गतिमान आणि आरामदायी व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वेने वंदे भारत ट्रेन ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन सुरू केली आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. वंदे भारत ट्रेन प्रकल्प हा मोदी सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो.
ही गाडी मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झाली असल्याने दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही गाडी देशातील विविध मार्गांवर सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. आतापर्यंत ही गाडी देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली आहे. आगामी काही दिवसात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी धावणार आहे. आपल्या राज्याला आतापर्यंत सहा वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे.
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे. आता राज्यातील आणखी काही मार्गावर ही गाडी सुरू होणार आहे.
कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन
नवी दिल्ली-पाटणा जंक्शन, दिल्ली सराई रोहिल्ला-ओखा, वांद्रे टर्मिनस-जम्मू तवी आणि मुंबई सेंट्रल-काठगोदाम दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थातच राजधानी मुंबईला आणखी दोन वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनल्स येथून या दोन नवीन वंदे भारत सुरू होणार आहेत. यामुळे मुंबईकरांचा प्रवास गतिमान होणार आहे.