Maharashtra Vande Bharat Train Timetable : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गेल्या काही वर्षांपासून वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हायस्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात सन 2019 मध्ये झाली आहे.
तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे पुढल्या वर्षी देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामुळे, देशातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्याचे नियोजन केंद्रातील मोदी सरकारने आखली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकार मार्च 2024 पर्यंत देशातील एकूण 75 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला चालवण्याचा विचार करत आहे. यामुळे आपल्या महाराष्ट्राला देखील आगामी काळात आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्याला आतापर्यंत सहा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या सहा मार्गांवर ही गाडी सुरू आहे. दरम्यान मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान सुरू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.
खरंतर कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्याच्या काळात रेल्वे गाड्यांसाठी पावसाळी वेळापत्रक जाहीर केले जाते. कोकणात पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने अपघात घडू नये यासाठी पावसाळी वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्यांचा वेग कमी केला जातो. याचं पावसाळी वेळापत्रकानुसार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्यात आलेल्या मुंबई-गोवा वंदे भारतचा स्पीड कमी करण्यात आला आहे.
सध्या स्थितीला ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते गोवा हा प्रवास दहा तासात पूर्ण करत आहे. विशेष म्हणजे ही वंदे भारत एक्सप्रेस पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त तीनच दिवस धावत आहे. पण आता एक नोव्हेंबर पासून पावसाळी वेळापत्रक संपणार आहे. त्यामुळे या गाडीचा वेग वाढणार आहे.
यामुळे 1 नोव्हेंबर 2023 पासून या वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई ते गोवा हा प्रवास फक्त सात तास आणि 45 मिनिटात पूर्ण होऊ शकणार आहे. शिवाय ही गाडी शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे.
कस असेल नवीन वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार, आता मानसून वेळापत्रकानुसार वंदे भारत ट्रेन सीएसएम ठेवून दररोज सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सुटेल आणि दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी मडगाव ला पोहोचेल. तसेच परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर, ही गाडी दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी मडगाव येथून सुटेल आणि रात्री दहा वाजून 45 मिनिटांनी ही गाडी सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.