Maharashtra Vande Bharat Express : केंद्र शासनाने ऑगस्ट 2023 पर्यंत संपूर्ण देशभरात एकूण 75 वंदे भारत एक्सप्रेस कार्यान्वित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न जोमात सुरू आहेत. आतापर्यंत भारतीय रेल्वेने एकूण 14 वंदे भारत एक्सप्रेस देशातील वेगवेगळ्या मार्गावर सुरू केल्या आहेत. यामध्ये अजमेर ते दिल्ली दरम्यान नुकतीच वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे.
एप्रिल महिन्यात आत्तापर्यंत चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत. तसेच आगामी काही दिवसात देशभरात 31 मार्गावर या ट्रेन चालवण्याचा प्लॅन रेल्वेच्या माध्यमातून आखण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राला देखील आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत आपल्या राज्यात एकूण चार वंदे भारत एक्सप्रेस कार्यान्वित असून आणखी काही ट्रेनची भेट मिळणार आहे.
यामुळे निश्चितच रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा या निमित्ताने मिळणार आहे. खरं पाहता, ही ट्रेन आपल्या जलद आणि आरामदायी प्रवासासाठी कमी वेळेत प्रसिद्ध झाली आहे. मात्र या ट्रेनचे तिकीट शताब्दी आणि राजधानी या एक्सप्रेसच्या तुलनेत महागडे आहे. यामुळे या ट्रेनचा प्रवास सर्वसामान्यांना परवडत नसल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. मात्र प्रवाशांची पसंती पाहता देशभरात ह्या ट्रेन सुरू होणार आहेत.
आता देशातील एकूण 75 मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ऑगस्ट पर्यंत सुरू करण्याचा मानस शासनाचा असून आतापर्यंत 14 वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत. आगामी काही दिवसात 31 मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण नेमक्या कोणत्या मार्गावर ही ट्रेन भारतीय रेल्वे सुरू करू शकते याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- काय सांगता! वंदे भारत एक्सप्रेसने आतापर्यंत केला ‘इतक्या’ लाख लोकांनी प्रवास; पंतप्रधान मोदींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
या मार्गावर लवकरच सुरू होणार वंदे भारत ट्रेन
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई ते मडगाव, जबलपूर ते इंदूर, हावडा ते पुरी, सिकंदराबाद ते पुणे, तिरुअनंतपुरम ते मंगलोर, चेन्नई एग्मोर ते कन्याकुमारी, मंगलोर ते म्हैसूर, इंदूर ते जयपूर, विजयवाडा ते चेन्नई सेंट्रल, जयपूर ते आग्रा, नवी दिल्ली ते कोटा, नवी दिल्ली ते बिकानेर, मुंबई ते उदयपूर, हावडा जंक्शन ते बोकारो स्टील सिटी आणि हावडा जंक्शन ते जमशेदपूर या मार्गांवर लवकरच भारतीय रेल्वे वंदे भारत गाड्या सुरू करणार आहे.
याशिवाय हावडा जंक्शन ते पाटणा, हावडा जंक्शन ते वाराणसी, विशाखापट्टणम ते शालीमार, भुवनेश्वर ते विशाखापट्टणम, तिरुपती ते विशाखापट्टणम, नरसापुरम ते विशाखापट्टणम, नरसापुरम ते गुंटूर, बेंगळुरू ते धारवाड, बेंगळुरू ते कुरनूल, बेंगळुरू ते कोईम्बतूर, एर्नाकुलम जंक्शन ते चेन्नई सेंट्रल, चेन्नई एग्मोर ते मदुराई जंक्शन स्टेशन, चेन्नई सेंट्रल ते सिकंदराबाद आणि बेंगळुरू ते कन्याकुमारी या मार्गांवर देखील आगामी काही महिन्यात ही गाडी सुरु होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा :- पुणे रिंग रोडबाबत महत्वाची बातमी; ‘या’ महिन्यात सुरु होणार प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम, पहा….