Maharashtra Untimely Rain : भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढली आहे. खरेतर गेल्या काही महिन्यापासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातही राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली होती. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना ऐन सुरुवातीलाच मोठा फटका बसला.
राज्यातील अनेक जिल्ह्यातील हरभऱ्याचे पीक अवकाळी पावसामुळे वाया गेले. मररोगामुळे हरभऱ्याचे पीक वाया गेले. परिणामी अनेक शेतकऱ्यांना हरभऱ्याची दुबार पेरणी करावी लागली.
एवढेच नाही तर गव्हाच्या पिकावरही अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम पाहायला मिळाला. अशातच आता नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली आहे.
राज्यात गेल्या काही तासांपूर्वी विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे. अशात ज्येष्ठ हवामान अभ्यासकं पंजाबराव डख यांनी देखील एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे.
पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आता राज्यात 10 जानेवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे राज्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातही अवकाळी पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज आहे.
डख यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यात 10 जानेवारी पर्यंत नागपूर, वर्धा, अकोला, वासिम, यवतमाळ, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, बार्शी, जत, कर्नाटक, पुणे या भागामध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.
तसेच या कालावधीत राज्यातील सोलापूर, पंढरपूर, बार्शी, येरमाळा, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, पाथर्डी, माजलगाव, लातूर, उदगीर, परभणी, नांदेड, सेलू, पाथरी, जिंतूर, रिसोड, हिंगोली, वाशिम, अकोला, अकोट या परिसरात जास्तीचा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.
या परिसरात पेंडओल होईल असा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात 10 जानेवारी नंतर हवामान कोरडे होणार अशी शक्यता आहे. जवळपास 21 फेब्रुवारी पर्यंत राज्यात हवामान कोरडेच राहणार आहे.
मात्र 22 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 या कालावधीत पुन्हा राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत चांगला मोठा अवकाळी पाऊस बरसणार अशी शक्यता आहे.