Maharashtra Rain : राज्यातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडले आहेत. सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसाने तसेच गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक यामुळे नेस्तनाभूत झाले आहे. गारपिटीमुळे सर्वाधिक नुकसान होत आहे.
पुणे, अहमदनगर, बीड, नासिक या जिल्ह्यातील अनेक भागात गारपिट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील तब्बल 50 ते 60 गावात एकाच दिवशी गारपीट झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस; महाराष्ट्रात तब्बल 120 वंदे भारत ट्रेन तयार होणार, पहा भारतीय रेल्वेचा संपूर्ण प्लॅन
दरम्यान, आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडणार आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खूळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजपासून पुढील पाच दिवस पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
24 एप्रिल ते 28 एप्रिल पर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे. विदर्भात पावसाची तीव्रता अधिक राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे. असेच 27 एप्रिल 2023 आणि 28 एप्रिल 2023 हे दोन दिवस मराठवाड्यातील बहुतांशी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठी अपडेट ! ही Vande Bharat ट्रेन….
तसेच या कालावधीत मराठवाड्यातील काही भागात गारपीट देखील होऊ शकते असं मत खुळे यांनी यावेळी व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी राज्यातील कमाल तापमानात दोन अंशाने तर किमान तापमानात चार अंशाने घट होणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला आहे. निश्चितच तापमानात घट होणार असल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
मात्र जर हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे. एकंदरीत पावसाची शक्यता लक्षात घेता आगामी पाच दिवस शेतकऱ्यांना अधिक सजव आणि सतर्क राहून आपली शेती कामे करायची आहेत. तसेच काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवायचा आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस बाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मोठी माहिती; म्हटले की, ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात…..