Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी परतीचा पाऊस (Rain) कोसळत असल्याचे चित्र आहे. राज्यात सर्वदूर परतीच्या पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. मित्रांनो खरे पाहता खरीप हंगाम देखील आता अंतिम टप्प्यात आला आहे अशा परिस्थितीत परतीच्या पावसाने शेतकरी बांधवांना चांगलाच जोराचा झटका दिला आहे.
तसेच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार, आजदेखील महाराष्ट्रात परतीचा पाऊस बरसणार आहे. तसेच आज पासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने (IMD) नमूद केला आहे. अशा परिस्थितीत संबंधित विभागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील तज्ञ लोकांकडून केले जात आहे.
मित्रांनो, आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मान्सूनने (Monsoon) महाराष्ट्रातून रजा घेतली आहे. दरम्यान आता राज्यात परतीचा पाऊस चांगलाच थैमान माजवत असल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाची (Monsoon News) शक्यता आहे.
तसेच मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र या विभागात उद्या म्हणजे शुक्रवारी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात शनिवारी पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने आपल्या हवामान अंदाजात नमूद केले आहे. मित्रांनो राज्यातील नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजी महाराज नगर पुणे अहमदनगर नाशिक ठाणे चंद्रपूर यवतमाळ नांदेड गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी सारखे पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून जी पिके थोडक्यात बचावली होती ती पिके जोपासण्यासाठी शेतकरी बांधव मोठ्या शर्तीने लढत होता. आता परतीच्या पावसामुळे पुन्हा एकदा खरीप हंगामातील पिकांना फटका बसत असल्याचे चित्र आहे.