Maharashtra Rain : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठा चेंज पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हवामानात होत असलेल्या बदलांमुळे शेतकरी राजा मोठा चिंतेत आला आहे. राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
नुकत्याच काही महिन्यांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीची हजेरी लागली. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील मोठे नुकसान झाले.
याशिवाय या चालू वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अवकाळी पावसाचा जोर फारसा नव्हता मात्र ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे.
अशातच आता भारतीय हवामान खात्याने देशातील दहा राज्यांमध्ये आज आणि उद्या अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात देखील लवकरच अवकाळी पावसाच तांडव सुरू होणार असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील हवामानासंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे.
काय म्हणतय भारतीय हवामान विभाग
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आज 7 फेब्रुवारी आणि उद्या 8 फेब्रुवारी 2024 ला देशातील अरुणाचलप्रदेशच्या काही भागात, हिमालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरा या राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे आपल्या महाराष्ट्राच्या हवामानाबाबत बोलायचं झालं तर राज्यात सध्या दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. सकाळचा गारठाही कमी झाला आहे. मात्र आता राज्यात शुक्रवारपासून काही भागात पावसाची शक्यता तयार होत आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक स्थिती तयार होत असल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं आहे. शुक्रवारपासून विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाच्या सरीची शक्यता आहे.
9 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पाऊस कायम राहणार असा अंदाज आहे. या कालावधीत राज्यातील संपूर्ण विदर्भ विभागात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटीसह मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.
विदर्भ विभागातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, वाशीम या 5 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे. मराठवाड्याबाबत बोलायचं झाल तर नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे.