Maharashtra Rain : भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासहित भारतातून मान्सून कधीच परतला असल्याचे जाहीर केले. पण, मान्सून परतल्यानंतरही महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे पावसाची तीव्रता ही फारच अधिक आहे. पण, आता गत दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता फारच कमी झाली आहे.
काल तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप होती. अर्थातच आता महाराष्ट्रातील हवामान कोरडे होत आहे. आज देखील राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. आज राज्यातील कोणत्याचं जिल्ह्याला येलो, आरेंज किंवा रेड अलर्ट देण्यात आलेला नाही.
म्हणजे पावसाचा जोर आता फारच ओसरलेला आहे. पण, असे असले तरी आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात सुद्धा किरकोळ पाऊस पडणार असा अंदाज आज समोर आला आहे.
तसेच उद्या विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता आहे पण पावसाचा जोर हा फारच कमी राहणार. यामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नसल्याचे दिसते. पण, तरीही पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीकामाचे नियोजन आखावे.
एकंदरीत आता हळूहळू राज्यातील हवामान कोरडे होणार आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडेच राहणार असा अंदाज आहे. काही हवामान तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच 30 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील.
मात्र तदनंतर राज्यात पावसाची शक्यता आहे. 30 ऑक्टोबर पासून ते तीन नोव्हेंबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज काही हवामान तज्ञांच्या माध्यमातून समोर आला आहे. अर्थातच यंदा दिवाळीत पावसाची शक्यता आहे.
येत्या काही दिवसांनी अर्थातच 28 ऑक्टोबरला वसुबारस असून याच दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, याच दिवाळी सणाच्या कालावधीत यंदा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तथापि पावसाची शक्यता असली तरीही या काळात फारसा अधिक पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी अगदीच घाबरून जाण्याचे कारण नाही असेही काही हवामान तज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान कृषी तज्ञांनी हा काळ रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा देखील यावेळी केला आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांची अद्याप पेरणी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर या पिकांची पेरणी करून घ्यावी.
आता राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार आहे आणि यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी हे हवामान फायद्याचे राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर रब्बी पिकांची पेरणी करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.