Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे मोसमी पावसा संदर्भात. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातही काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर आधीच्या तुलनेत वाढला असल्याचे चित्र आहे.
मात्र असे असले तरी पावसाचे स्वरूप हे विखुरलेले आहे. म्हणजेच सर्व दूर पाऊस होत नाहीये. विखुरलेल्या पावसामुळे पावसाची सरासरी जरी आकडेवारीने भरून निघत असली तरीदेखील प्रत्यक्षात काही भाग हा कोरडाठाक आहे. हेच कारण आहे की अजूनही अनेक भागातील शेतकरी बांधव जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
येत्या काही दिवसांनी जर मुसळधार पाऊस झाला नाही तर आगामी काळात पाण्याची मोठी टंचाई होण्याची शक्यता आहे. कारण की अजूनही अनेक भागांमध्ये विहिरींना पाणी उतरलेले नाही. तसेच राज्यातील अनेक मोठ्या धरणांमध्ये अजूनही पाण्याची आवक फारशी वाढलेली नाही.
यामुळे आजही अनेक भागातील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. अशातच आता भारतीय हवामान खात्याचा एक नवीन सुधारित हवामान अंदाज जारी झाला आहे. या हवामान अंदाजात भारतीय हवामान खात्याने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विशेष म्हणजे काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस होण्याची शक्यता देखील आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
अनेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट मिळाला आहे. दरम्यान आता आपण भारतीय हवामान खात्याचा हा सुधारित अंदाज थोडक्यात समजून घेणार आहोत.
कोणत्या जिल्ह्यांना मिळालाय रेड अलर्ट?
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि विदर्भातील गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमधील काही भागात अतिवृष्टी सारखा पाऊस होईल असे देखील आयएमडीने स्पष्ट केले आहे.
याच पार्श्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्यांना आज रेड अलर्ट मिळाला आहे. यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जाणकारांनी केले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना मिळाला ऑरेंज आणि येलो अलर्ट ?
IMD ने आज उत्तर कोकणातील ठाणे, दक्षिण कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र विभागातील सातारा, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव अर्थातच उत्तर महाराष्ट्रात आणि उर्वरित मराठवाड्याला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, पालघर, पुणे आणि कोल्हापूरला देखील आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.