Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरतर यावर्षी मान्सूनचे उशिराने आगमन झाले. भारताच्या मुख्य भूमीत आणि महाराष्ट्राच्या मुख्य भूमीतही मान्सून विलंबाने पोहोचला. शिवाय मान्सूनच्या अगदी सुरुवातीला विविध हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून यावर्षी कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची तसेच सामान्य नागरिकांची धाकधूक वाढली होती. मात्र, उशिराने का होईना मात्र पावसाचे आगमन दणक्यात झाले आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजे जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. मात्र तदनंतर पावसाची तीव्रता वाढली. जुलै महिन्यात राज्यात सर्व दूर जोरदार पाऊस झाला. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली.
जून महिन्यातील पावसाची तूट जुलै महिन्यातील पावसाने भरून काढली. मात्र, असे असले तरी आता पावसाचा मोठा खंड पडणार असे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने आगामी दोन महिन्याच्या पावसाबाबतची स्थिती स्पष्ट केली आहे. हवामान विभागाने आगामी दोन महिना पाऊसमान कस राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
दरम्यान आज आपण हवामान विभागाने आगामी दोन महिने महाराष्ट्रात कसं हवामान राहणार याबाबत काय माहिती दिली आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा 13 टक्के अधिक पाऊस झाला आहे. मात्र आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस ओसरणार आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात केवळ 92 टक्के पाऊस होणार आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद या दोन महिन्यात होणार असा अंदाज आहे. देशभरातील किनारपट्ट्यांचा परिसर आणि ईशान्य भारतातील काही भागात या दोन महिन्यात चांगला पाऊस पडेल मात्र उर्वरित भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असा अंदाज आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात देशात सरासरी 422.8 मी पाऊस पडतो. मात्र यंदा यापैकी 92% एवढाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. या दोन महिन्याच्या काळात प्रामुख्याने मध्य भारतात कमी पाऊस पडू शकतो असे मत आय एम डी ने व्यक्त केले आहे.
प्रशांत महासागरात एल निनोची तीव्रता अधिक होणार असल्याने आगामी दोन महिने देशात कमी पावसाचा अंदाज व्यक्त होत आहे. निश्चितच ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी मारक ठरणारी राहणार आहे. यामुळे आता आगामी दोन महिने कसे हवामान राहते यावरच शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून राहणार आहे.