Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस सारख्या महत्त्वाच्या पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. तसेच उडीद, बाजरी, मका या पिकांची हार्वेस्टिंग देखील सुरू झाली आहे. यामुळे सध्या शेतकरी बांधव आपल्या परिवारासमवेत शिवारात लगबग करत असल्याचे दिसत आहे.
पण, शेतकऱ्यांना हार्वेस्टिंगची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी लागणार आहेत. कारण की, भारतीय हवामान खात्याने लवकरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असा अंदाज दिला आहे. राज्यात पुन्हा एकदा जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या नवीन अंदाजानुसार, आजपासून पुढील दोन दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. मात्र तदनंतर महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाचे आगमन होणार असा अंदाज दिला आहे. आज 22 सप्टेंबर आणि उद्या 23 सप्टेंबरला महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मात्र 24 सप्टेंबरला राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात 24 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आणि त्यापुढील पाच दिवस म्हणजेच 29 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार खरे तर राज्यात उद्यापासूनच पावसाला सुरुवात होणार आहे. मात्र पावसाचा जोर वाढणार तो 24 तारखेपासून. उद्या मराठवाडा आणि विदर्भात पाऊस सक्रिय होईल आणि 24 तारखेपासून या भागातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी पावसाची तीव्रता ही फारच अधिक राहणार असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे, मुंबई उपनगरसह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. एकंदरीत आज आणि उद्या राज्यातील हवामान कोरडे राहिल आणि त्यानंतर महाराष्ट्रात पाऊस जोर धरणार आहे.