Maharashtra Rain : सध्या राज्यात मोसमी पाऊस तसेच पूर्व मोसमी पाऊस गायब झाल्याचे चित्र आहे. राज्यात मान्सून दाखल होऊन जवळपास 11 ते 12 दिवसांचा कालावधी उलटला आहे. मान्सून हा 11 जूनला तळ कोकणात आला होता. पण मान्सून आ
गमन झाल्यानंतर हवामानात मोठा बदल झाला यामुळे मान्सूनचा पुढील प्रवास अजून सुरू झालेला नाही. मोसमी पावसाला सुरुवात झालेली नसल्याने राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. मान्सून अजूनही तळ कोकणातच आहे.
मान्सून तळकोकण सोडण्याचे नाव घेत नाहीये आणि राज्यात पूर्व मौसमी पावसाने देखील दडी मारली आहे. यामुळे खरीप हंगामातील पीक पेरणी संकटात सापडली असून यावेळी पेरा जवळपास पंधरा दिवसांनी लांबला आहे.
हे पण वाचा :- अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या सुधारित वाणाचे कांदा बियाणे आता ‘या’ ठिकाणी उपलब्ध होणार !
विशेष बाब म्हणजे अजूनही राज्यातील कोणत्याच भागात पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या अजून किती लांबतील? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे सध्या शेतकरी बांधव केविलवाण्या नजरेने आकाशाकडे पाहत आहेत.
अशातच मात्र पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी एक सुखद बातमी समोर येत आहेत. ती म्हणजे राज्यात उद्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. हवामान विभागानुसार राज्यात उद्यापासून अर्थातच 23 जून 2023 पासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.
हे पण वाचा :- कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार कापसाची खरेदी, तदनंतर….
कोकणातील काही भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण उद्यापासून पावसाला सुरुवात होणार असली तरी देखील पावसाचा जोर 24 आणि 25 जून नंतरच वाढणार असे सांगितले जात आहे. मराठवाड्यात 23 ते 29 जून दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
निश्चितच उद्यापासून पावसाला सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही सुखद बातमी राहणार आहे. परंतु शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन करताना काळजी घेणे जरुरीचे आहे. यंदा पेरणी किमान 75 ते 100 मिलिमीटर पाऊस पडल्यानंतरच करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे पण वाचा :- देव पावला ! 23 ते 29 जून दरम्यान ‘या’ सात जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस, तुमच्या जिल्ह्यात कसं राहणार हवामान? वाचा….