Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसा संदर्भात. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक अवकाळी पावसामुळे वाया गेले आहे. विशेष म्हणजे राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश मधील काही भागात गारपीट झाल्याची नोंदही करण्यात आली आहे.
अशातच आज पुन्हा एकदा राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे राज्यातील काही भागात उन्हाच्या झळा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
खऱ्या अर्थाने आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ विभागातील यवतमाळ येथे 39.5 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
मात्र आज राज्याच्या विदर्भ विभागातील पूर्वेकडील जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना विशेष सतर्क आणि सावध राहण्याची गरज राहणार आहे.
पूर्व विदर्भ वगळता मात्र राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि येथे उन्हाचे चटके बसतील असे आय एम डी ने स्पष्ट केले आहे.
आज पूर्व विदर्भातील अर्थातच नागपूर विभागातील भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यायची आहे.
या पार्श्वभूमीवर आज पूर्व विदर्भातील या दोन्ही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. एकंदरीत आज राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे सत्र आता थांबणार हे स्पष्ट होत आहे.
तथापि पूर्व विदर्भात अजूनही अवकाळी पावसाचे ढग आहेत. पण, पूर्व विदर्भातील ही अवकाळी पावसाची परिस्थिती देखील लवकरच निवळणार आहे.