Maharashtra Rain : या चालू मार्च महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली होती. या महिन्याच्या सुरुवातीला वादळी पावसाचे संकट पाहायाला मिळाले होते. मध्यंतरी मात्र राज्यातील हवामान कोरडे झाले होते. परंतु आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे आणि गारपीटीचे सत्र सुरू झाले आहे.
राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने आणि गारपिटीने हजेरी लावली असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात काल अर्थातच रविवारी अवकाळी पाऊस आणि गारपीट होणारा असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. यानुसार काल राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीटीची हजेरी लागली आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे.
विशेष बाब अशी की भारतीय हवामान खात्याने आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज सुद्धा पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे.
आज विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीचा, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पण, उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहणार असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कुठं बरसणार वादळी पाऊस अन गारपीट
IMD ने सांगितल्याप्रमाणे, आज पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पाऊस अन गारपिटीचा इशारा कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्यांना आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
तसेच अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे मात्र या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. अर्थातच गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या तुलनेत गडचिरोली भंडारा वर्धा नागपूर यवतमाळ अमरावती या जिल्ह्यात पावसाची आणि गारपीटीची तीव्रता काहीशी कमी राहणार आहे.
दुसरीकडे उर्वरित विदर्भातील 3 जिल्ह्यासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे.
पावसाचे कारण काय?
सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे सत्र सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात वादळी पाऊस सुरू आहे. यामुळे वादळी पावसाचे नेमके कारण काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. याबाबत IMD ने माहिती दिली आहे.
हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे पश्चिम विदर्भापासून मराठवाडा, ते कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा कमी दाबाचा पट्टा सध्या स्थितीला महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार करत आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम राहण्याची शक्यता आहे.