Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने 24 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज दिला आहे. 24 ते 27 सप्टेंबर दरम्यानच्या चार दिवसांच्या काळात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे या काळात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस पडू शकतो अशी शक्यता आहे. या अनुषंगाने हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना रेड, काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
खरे तर गेल्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. मात्र आज पासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. जवळपास 27 तारखेपर्यंत राज्यात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस ?
24 सप्टेंबर : हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र आज पावसाचा येल्लो अलर्ट राहणार आहे.
25 सप्टेंबर : उद्या रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमधील काही भागात अतिवृष्टी देखील होऊ शकते. तसेच मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. परंतु सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांना कोणताच अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
26 सप्टेंबर : 26 सप्टेंबरला पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज कलर राहणार आहे. विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व पाच जिल्ह्यांना आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांना येलो लाईट जारी करण्यात आला आहे.
27 सप्टेंबर : नंदुरबार, धुळे, नाशिक, रायगड, पुणे तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना 27 सप्टेंबरला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी मात्र कोणताच अलर्ट राहणार नाही.