Maharashtra Rain News : सप्टेंबर महिना सुरू झाला की साऱ्यांना वेध लागतं ते परतीच्या पावसाचं. सप्टेंबर मध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. दरवर्षी 17 सप्टेंबरच्या सुमारास मान्सून वायव्य भारतातून माघारी परतत असतो. यंदा मात्र मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला थोडा उशीर झाला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबत मोठी माहिती दिली आहे. हवामान खात्याने यंदा महाराष्ट्रात परतीचा पाऊस मनसोक्त बरसणार असे म्हटले आहे.
भारतीय हवामान खात्याने 10 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात माहिती दिली आहे. यात 22 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार? महाराष्ट्रात परतीचा पाऊस कधी येणार यासंदर्भात सविस्तर अशी अपडेट देण्यात आली आहे.
काय म्हणतय भारतीय हवामान विभाग
भारतीय हवामान विभागाने आजपासून पुढील तीन आठवड्याचा अंदाज जारी केला आहे. यामध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास येत्या दोन दिवसात सुरू होणार असे म्हटले गेले आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, आज पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने राज्यात कमाल तापमान वाढले होते.
मात्र, आज पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून आगामी काळात कमाल तापमानात घट येणार असा अंदाज आहे. एवढेच नाही तर यंदा राज्यात परतीचा पाऊस अक्षरशा धुमाकूळ घालणार आहे. हवामान खात्याने पुढील तीन आठवडे राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील तीन आठवडे अर्थातच 10 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता असून महाराष्ट्रात परतीचा पाऊस यंदा फारच मनसोक्त बरसण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसानही होऊ शकते ही भीती देखील व्यक्त केली जात आहे. म्हणून यंदा शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे 10 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात सर्व दूर पाऊस पडणार असा अंदाज आहे मात्र दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये 10 ऑक्टोबर नंतरही पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे.
महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही निवडक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन आठवडे सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील सोलापूर, सांगली, धाराशिव या जिल्ह्यांत पुढील दोन आठवडे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असा अंदाज आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील बीड, लातूर जिल्ह्यांच्या काही भागांत पुढील दोन आठवडे सरासरी एवढा पाऊस पडणार अशी शक्यता आहे. तसेच, महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांनी पावसाची तीव्रता आणि व्यापकता वाढण्याची शक्यता आहे.
२७ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात सर्व दूर पाऊस पडणार असा अंदाज आहे. 27 सप्टेंबर पासून ते गांधी जयंती पर्यंत राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गांधी जयंती पर्यंत दक्षिण कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे.
एवढेच नाही तर गांधी जयंती नंतरही आठवडाभर राज्यात सर्व दूर पाऊस पडेल असा अंदाज आहे. तीन ते दहा ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात सर्व दूर पाऊस पडणार अशी शक्यता आयएमडीकडून वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम राजस्थान आणि कच्छ या भागातून 23 सप्टेंबर पासून म्हणजेच उद्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. दरम्यान, यंदा महाराष्ट्रात परतीचा पाऊस खूपच मनसोक्त बरसणार अन नवरात्र उत्सवात देखील जोरदार पाऊस होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.