Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची थोडीशी काळजी वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरंतर राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. राज्यातील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
गेल्या चार ते पाच दिवसांच्या काळात झालेल्या अवकाळी पावसाचा जोर हा खूपच कमी होता. मात्र तरीही रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करत असलेल्या शेतकऱ्यांचा जीव यामुळे टांगणीला लागला आहे.
यामुळे रब्बी पिकांची हार्वेस्टिंग प्रभावित होत आहे. दरम्यान गेल्या 24 तासात राज्यातील अवकाळी पावसाचे सत्र आता बऱ्यापैकी थांबले असल्याचे पाहायला मिळाले आहे.
पण, राज्यातील अनेक भागातील दिवसाचे कमाल तापमान आता चाळीस अंश सेल्शियस पेक्षा अधिक नमूद केले जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, विदर्भातील अकोला, बुलढाणा इत्यादी जिल्ह्यांमध्ये तापमानाने विक्रम मोडले आहेत.
दरम्यान अवकाळी पाऊस आता विश्रांती घेणार असे बोलले जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील तापमानात आणखी वाढ होऊ शकते. दुसरीकडे सध्या पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी ही विश्रांती बोटावर मोजण्याइतक्या दिवसाचीच राहणार आहे.
कारण की राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात एप्रिल महिन्यातही अवकाळी पावसाची शक्यता आहे.
अवकाळी पावसाला केव्हा सुरुवात होणार ?
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे, येत्या सहा दिवसांनी अर्थातच 7 एप्रिल 2024 पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे. सात एप्रिल ते 10 एप्रिल च्या कालावधीत राज्यात पाऊस बरसणार असे आयएमडीचे म्हणणे आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार होत असल्याने पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार असे म्हटले जात आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात हा पाऊस पाहायला मिळणार आहे.
दुसरीकडे सात ते दहा एप्रिल तर मिळणार देशातील इतर राज्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. परंतु आज पासून तीन एप्रिल पर्यंत देशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
या कालावधीत मात्र आपल्या महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. राज्यातील हवामान सहा एप्रिल पर्यंत कोरडे राहण्याची शक्यता आहे. परंतु 7 एप्रिल नंतर राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाला सुरुवात होईल आणि तेथे वादळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे.