Maharashtra Rain : गेल्या वर्षाचा शेवट अवकाळी पावसाने झाला. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली. मात्र नवीन वर्षाची सुरुवात तरी चांगली होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.
खरीप हंगामात तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र आता येणाऱ्या नवीन वर्षात अवकाळी पाऊस थांबेल आणि रब्बी हंगामातून चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांच्या या आशेवर अवकाळीने पाणी भरले आहे.
कारण की नवीन वर्षाची सुरुवातच अवकाळी पावसाने झाली आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे रब्बीची पिके खराब होत आहेत, तर काही ठिकाणी ढगाळ हवामानामुळे पिकांवर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे.
या बदललेल्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी अधिकची फवारणी करावी लागत आहे. पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे, बुरशीजन्य रोगांचे अन वेगवेगळ्या कीटकांचे सावट पाहायला मिळत आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दहा जानेवारीपर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र यानंतर हवामान कोरडे होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
अर्थातच आता उद्यापासून हवामान कोरडे होणार अशी आशा आहे. पण, हवामान खात्याने उद्या देखील अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे.
जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांनी मात्र उद्यापासून हवामान कोरडे होईल असे सांगितले आहे. राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग या नवीन वर्षात पुढील महिन्यात देखील कायम राहण्याची शक्यता आहे.
पुढील महिन्यात अर्थातच फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे. एवढेच नाही तर मार्चमध्ये सुद्धा अवकाळी पावसाचे तांडव सुरूच राहणार आहे.
पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे उद्यापासून राज्यात 21 फेब्रुवारीपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. मात्र 21 फेब्रुवारी नंतर अर्थातच 22 फेब्रुवारी पासून ते 10 मार्च 2024 पर्यंत राज्यावर अवकाळी पावसाचे संकट राहणार आहे.
या कालावधीत राज्यात मोठा अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज आहे. यामुळे ऐन काढणीच्या अवस्थेत असणाऱ्या पिकांना मोठा फटका बसू शकतो. परिणामी उत्पादनात घट येणार आणि शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान होणार अशी भीती आता व्यक्त होत आहे.