Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता कमी झाली आहे. खरे तर, गणेश चतुर्थीच्या दिवशी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली होती. सात ते दहा सप्टेंबर दरम्यान याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला.
मात्र आत्ता बरेच दिवस झालेत राज्यातील पाऊस जवळपास सुट्टीवर गेल्यासारखे भासत आहे. तथापि मुंबई सह कोकणात पावसाचा जोर कायम आहे. कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू असल्याचे दिसतय.
अशातच जेष्ठ हवामान अभ्यासक आणि भारतीय हवामान खात्यातील निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी आगामी पंधरा दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार म्हणजेच 30 सप्टेंबर पर्यंत राज्यातील हवामान कसे राहणार या संदर्भात मोठे कामाची माहिती दिली आहे. आता आपण याच पंधरा दिवसाच्या हवामानाबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
काय म्हणतात माणिकराव खुळे?
खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सह कोकणात सध्या चालू असलेली जोरदार पावसाची शक्यता पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर उद्या अर्थातच 17 सप्टेंबर पासून विदर्भातही मध्यम पावसाची शक्यता तयार होत आहे.
याशिवाय उद्यापासून खान्देश अर्थातच जळगाव, धुळे, नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्येही मध्यम पावसाची शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे 25 ते 29 सप्टेंबर दरम्यान आहे अशीच शक्यता कायम राहणार आहे. एकंदरीत, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमधील रजेवर गेलेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे.