Maharashtra Rain : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि काळजी वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरेतर सध्या स्थितीला रब्बी हंगामातील पिके ही महत्त्वाच्या टप्प्यात आली आहेत. रब्बी हंगामातील पिके हार्वेस्टिंगसाठी तयार होत आहेत.
अशातच, मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही पावसाने थैमान माजवले आहे. अवकाळी पावसाच्या थैमानामुळे मात्र रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे.
शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अशातच शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढणार आहे. कारण की, भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार आज पासून पुढील दोन दिवस राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत राज्यात जोरदार वादळी पाऊस होईल आणि काही भागात गारपीट देखील होईल असा अंदाज आहे. आगामी दोन ते तीन दिवस विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.
मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यात आगामी दोन दिवस पावसाची शक्यता आहे. तसेच आज जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात पावसाची हजेरी लागेल असा अंदाज आहे.
खानदेश मधील जळगाव आणि धुळे येथे काही ठिकाणी जोरदार पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष बाब अशी की मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे. यामुळे यासंबंधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहणे अपेक्षित आहे.