Maharashtra Rain : महाराष्ट्रातील हवामानात एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. हवामानाने आता आपला मूड बदलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अगदी अतिवृष्टी सारखा पाऊस होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
खरे तर गेल्या महिन्यात म्हणजे जून महिन्यात महाराष्ट्रात फारच कमी पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी फक्त पेरणीपुरता पावसाची हजेरी पाहायला मिळाली होती. यानंतर पाऊस हा गायबचं झाला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अशीच परिस्थिती आहे.
पावसाचा कुठेचं थांगपत्ता लागत नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी नक्कीच जोरदार पाऊस सुरू आहे मात्र अजूनही असे काही भाग आहेत जे की पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक भागातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. दरम्यान गेल्या काही तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात खूपच जोराचा पाऊस झाला आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे.
कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला असून अगदी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे.
यामुळे या सदर भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आगामी 24 तास राज्यातील मध्य महाराष्ट्रातील सातारा, दक्षिण कोकणातील रायगड आणि विदर्भातील चंद्रपुर , नागपुर , वर्धा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सारख्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच आज गडचिरोली , यवतमाळ , अमरावती , भंडारा , गोंदिया , नांदेड , ठाणे , पुणे , कोल्हापुर , पालघर , रायगड , सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
तसेच, त्या पुढील दोन दिवस राज्यातील विदर्भातील अकोला , अमरावती , नागपुर , वर्धा , यवतमाळ तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोकणातील रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.
या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना रेड अलर्ट मिळाला आहे. यामुळे या संबंधित भागातील नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे. खूपच आवश्यकता असेल तेव्हाच घराबाहेर पडा असा सल्लाही जाणकारांनी दिला आहे.