Maharashtra Rain : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात परतीच्या पावसाची तीव्रता वाढली आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव सहित राज्यातील विदर्भ मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांच्या काळात कमी अधिक प्रमाणात परतीच्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात दिवसाचे कमाल तापमान कमालीचे वाढले होते. पण गेल्या दोन दिवसांपासून परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
अशातच मात्र पावसासंदर्भात ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी एक मोठी माहिती दिली आहे. खरे तर सध्या राज्यात परतीचा पाऊस सुरू आहे, या पावसामुळे मात्र राज्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर कमी होऊ शकतो असा एक अंदाज समोर येत आहे. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पासून पुढील पाच दिवस म्हणजेच 16 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे.
खुळे यांनी म्हटल्याप्रमाणे 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यानच्या तीन दिवसात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये, खानदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये, तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या 18 जिल्ह्यात आणि विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता आहे आणि अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडेल असे भासत आहे.
अर्थातच राज्यातील पावसाचा जोर आता उद्यापासून कमी होणार आहे. पाऊस पडला तरी खूपच हलका पाऊस पडणार अशी शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी भीती न बाळगता आपल्या शेतीकामांचे नियोजन आखावे असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
दुसरीकडे माणिकराव खुळे यांनी 17 ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे.
मान्सूनच्या प्रतीच्या पावसाच्या प्रवासाबाबत बोलताना खुळे यांनी, 5 ऑक्टोबरला मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर अर्थातच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या वेशीवर आला मात्र तो सध्या नंदुरबार जिल्ह्यातच खिळून बसला आहे.
यामुळे परतीच्या पावसा संदर्भात सध्या कोणताच अंदाज वर्तवला जाऊ शकत नाही, असे खुळे यांनी स्पष्ट केलय. आता जेव्हा मान्सूनचा महाराष्ट्रातील परतीचा प्रवास सुरू होईल तेव्हाच याचे योग्य ते चित्र स्पष्ट होईल अशी ही माहिती खुळे यांनी यावेळी दिली आहे.