Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये विविध भागात पावसाची हजेरी लागली आहे. 2 ऑक्टोबर रोजी हवामान खात्याने पुढील 48 तासात महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये अर्थातच काल तीन ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.
दरम्यान, पुढील 24 तासात राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. वास्तविक, मान्सून आता अंतिम टप्प्यात आला असून देशातील विविध राज्यांमधून मान्सूनने माघार घेतली आहे.
पण राज्यात अजूनही मान्सून सक्रिय आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर अजून कायम आहे. यामुळे मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरतर, राज्यात जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा होता.
पण सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. जोरदार पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणातील पाण्याचा साठा वाढला आहे. यामुळे खरीपसोबतच येत्या रब्बी हंगामातील पिकांना देखील मोठा फायदा मिळणार आहे.
येत्या 24 तासात राज्यातील या भागात कोसळणार मुसळधार पाऊस
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालचा उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. या हवामान प्रणालीमुळे राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.
गेल्या दोन दिवसांच्या काळात राज्यातील कोकण किनारपट्टीत तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.विशेष म्हणजे येत्या 24 तासात राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे मुंबई, पुणे, ठाण्यात आजही पावसाची शक्यता आहे.
त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील काही भागासाठी पावसाचा अलर्ट देखील देण्यात आला आहे. परंतु उर्वरित राज्यांमध्ये प्रामुख्याने ढगाळ हवामान राहील आणि पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे.