Maharashtra Rain : गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात शेतीकामाला मोठा वेग आला आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यात अद्याप पावसाची (Monsoon) हजेरी पाहायला मिळत आहे.
काल राजधानी मुंबई सह राज्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस (Monsoon News) झाला. राजधानी मुंबईत झालेल्या पावसामुळे (Mumbai Rain) जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र काही काळ बघायला मिळाले. दरम्यान आज सकाळी पासून राजधानी मुंबईत पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे.
काल हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती त्या अनुसार राज्यात काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीकामे पूर्णता थांबली होती. शिवाय सप्टेंबर मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत.
यामुळे काही धरणातून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज देखील महाराष्ट्रात पाऊस कोसळणार असल्याचे भाकित सांगितले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते आज विदर्भात पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने विदर्भातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते आज विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाकडून संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
मित्रांनो या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाला असून धरण साठ्याच्या पाण्यात कमालीची वाढ झाली आहे. यामुळे उन्हाळ्यात पाण्याची चणचण भासणार नसल्याचे जाणकार नमूद करत आहे. निश्चितच उन्हाळी हंगामात शेतकरी बांधवांना यामुळे फायदा मिळणार आहे.