Maharashtra Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाला (Rain) आता कुठे ब्रेक लागला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा (Monsoon) जोर कमी झाला आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यात अजूनही अधूनमधून पाऊस (Monsoon News) बरसत आहे. राज्यातील अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसत असल्याने शेती पिकांना याचा फटका बसत आहे.
नाशिक जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेती पिकांना मोठा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या व्यतिरिक्त राज्यातील बीड, बुलढाणा, औरंगाबाद तसेच राजधानी मुंबई आणि ठाणे परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस यावेळी नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई व ठाणे परिसरात वाहतूक कोंडी देखील बघायला मिळाली आहे.
मित्रांनो जुलै ऑगस्ट आणि या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे राज्यातील अनेक धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली आहेत. यामुळे राज्यातील प्रमुख धरणातून पाण्याचा विसर्ग देखील केला जात आहे. अशा परिस्थितीत नदीकाठी वसलेल्या गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार आज मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. या विभागांना भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट (Rain Alert) जारी करण्यात आला आहे. संबंधित विभागातील नागरिकांना या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन जाणकार लोकांकडून केले जात आहे.
दरम्यान, सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील मुख्य पिकांना मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले असल्याने खरीप हंगामातील पिकांवर रोगराईच संकट निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पिक कुजायला लागली आहेत. एकंदरीत सध्या कोसळत असलेल्या पावसाने शेतकरी बांधवांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या पिकांची नासाडी करण्यास सुरुवात केली आहे.
मित्रांनो मात्र शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. नुकत्याच काही दिवसापूर्वी शासनाने शेतकरी बांधवांसाठी 3500 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मदत जाहीर केली आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार मराठवाडा विभागासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. आजपासून औरंगाबाद वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.