Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर पुन्हा एकदा ओसरला असल्याचे चित्र आहे. खरे तर गेल्या महिन्यात म्हणजे जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आणि यामुळे राज्यातील शेतकरी बांधव फारच चिंतेत सापडले आहेत. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये खरिपातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरिपातील पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, पीक पेरणीनंतर आता शेतकऱ्यांपुढे पावसाच्या लहरीपणाच मोठ संकट उभ राहिल आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
मात्र, राज्यातील अनेक भागांमध्ये विहिरींना अजून पाणी उतरलेले नाही. तलावांमध्येही अजून अपेक्षित पाणी आलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे विहिरींना पाणी उतरणार नाहीये.
यामुळे जोरदार पाऊस कधी होणार हा मोठा सवाल आहे. अशातच आता हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामानात अचानक बदल झाला असून जोरदार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याचा अंदाज समोर येत आहे.
दरम्यान, आता आपण हवामान खात्याने राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस?
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व 11, मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, जालना या पाच जिल्ह्यांमध्ये, खानदेश मधील नंदुरबार वगळता उर्वरित दोन जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, कोल्हापूर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आला आहे.
राज्याच्या उर्वरित भागात मात्र हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. याशिवाय हवामान खात्याने उद्या अर्थातच सात जुलैला विदर्भातील सर्वच्या सर्व 11, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर अन खानदेशातील नंदुरबार वगळता उर्वरित दोन जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.