Maharashtra Rain : यंदा मान्सून आगमनास विलंब झाला. मान्सूनचे आगमन विलंबाने झाले शिवाय मान्सून अजूनही कमकुवतच आहे. यामुळे यंदा दुष्काळ पडणार की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. अशातच मात्र भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्युज समोर येत आहे.
ही गुड न्यूज आहे पावसा संदर्भात. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात लवकरच मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असून मान्सूनचा पुढील प्रवास वेगाने होणार आहे. एवढेच नाही तर 23 जून पासून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 23 जून पासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस पडेल असा अंदाज IMD ने व्यक्त केला आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने याबाबत माहिती दिली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार 23 जून पासून मराठवाड्यात पाऊस सक्रिय होणार आहे. मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यात 23 जून ते 29 जून दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! पीएम किसान योजनेबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, योजनेच्या अंमलबजावणीत येणार पारदर्शकता, वाचा….
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस
प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितल्याप्रमाणे, येत्या दोन दिवसात अर्थातच 23 जूनला मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यात वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. तसेच 24 जूनला म्हणजे येत्या तीन दिवसात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता तयार होत आहे.
या कालावधीत मात्र 30 ते 40 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहणार आहेत. अर्थातच या कालावधीमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे यामुळे निश्चितच नुकसान देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अजूनच सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. 23 जून पासून ते 29 जून पर्यंत मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
हे पण वाचा :- पांढरं सोन शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ; कापसाच्या ‘या’ वाणातून मिळणार अधिकचे उत्पादन, वाचा….
वास्तविक एक जुलै पर्यंत मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. मात्र मराठवाड्यात अजूनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला जाणकार लोकांनी शेतकऱ्यांना देऊ केला आहे.
साधारणता 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल असे मत कृषी तज्ञांनी देखील व्यक्त केले आहे. यामुळे मराठवाड्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या शक्यता असली तरीही पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये असे आवाहन यावेळी केले जात आहे. मात्र मराठवाड्यात पावसाला सुरुवात होणार असल्याने तेथील शेतकऱ्यांसाठी निश्चितच ही बातमी दिलासा देणारी ठरणार आहे.