Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहेत. राज्यात आता लवकरच गुलाबी थंडीची चाहूल लागणार असा अंदाज समोर आला आहे. आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे मात्र तदनंतर पाऊस रजा घेईल असे बोलले जात आहे.
खरे तर गत काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. मान्सूनोत्तर पावसामुळे राज्यातील बहुतांशी भागांमधील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने गुरुवारपर्यंत महाराष्ट्रात पाऊस सुरू राहणार असे म्हटले आहे.
तथापि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात 29 ऑक्टोबर पर्यंत पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असेही हवामान तज्ञांनी नमूद केले आहे. मात्र तदनंतर राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागेल. आता हळूहळू राज्यात थंडीची तीव्रता वाढेल.
काल राज्यातील नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. अहिल्या नगर जिल्ह्यातही गतकाही दिवसात चांगला जोरदार पाऊस झालाय. पण आता पाऊस रजा घेणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून खरीप हंगामातील कांदा समवेतच फळबाग पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, येत्या आठवड्याभरात नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला या भागात थंडीला सुरवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. दक्षिण महाराष्ट्रात मात्र एक नोव्हेंबर नंतर थंडीला सुरुवात होईल.
म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रात एक नोव्हेंबर पर्यंत गुलाबी थंडीची चाहूल लागेल. त्यानंतर मग थंडीची तीव्रता वाढणार आहे. सध्याचा पाऊस हा कांदा समवेतच फळबाग पिकांसाठी घातक आहे मात्र या पावसाचा आगामी रब्बी हंगामासाठी नक्कीच फायदा होणार आहे.
रब्बी हंगामातील पिकांसाठी हा पाऊस वरदान ठरेल आणि यामुळे रब्बी हंगामातून शेतकऱ्यांना चांगली कमाई काढता येईल अशी आशा आहे. एकंदरीत राज्यात 29 ऑक्टोबर पर्यंत पाऊस सुरूच राहील मात्र त्यानंतर पाऊस रजा घेईल आणि प्रत्यक्षात हिवाळ्याला सुरुवात होणार आहे.