Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात रोजाना पावसाची (Rain) हजेरी बघायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाचा (IMD) अंदाज खरा ठरत आहे. मात्र कालपासून पावसाचा (Monsoon) जोर कमी झाला आहे. असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस (Monsoon News) कोसळत आहे.
यामुळे सखल भागातील जनजीवन विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे. काल राजधानी मुंबई आणि ठाणे परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील (Ahmednagar) अहमदनगर, खान्देश मधील जळगाव, आणि मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad) या जिल्ह्यांत देखील पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळाली. यामुळे शहरी भागात वाहतुकीसाठी समस्या निर्माण झाली.
याशिवाय खरिपातील पिकांना देखील या पावसामुळे फटका बसला आहे. काही ठिकाणी सध्या कोसळत असलेल्या पाऊस पिकांसाठी वरदान ठरत आहे तर काही ठिकाणी या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसून पिकांची नासाडी होत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रात आज देखील पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. पावसासाठी पोषक वातावरण बनत असल्याने विदर्भात पुढील तीन ते चार दिवस पाऊस कोसळणार आहे. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता असून या विभागात मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. आज विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाकडून गेलो येलो अलर्ट करण्यात आला आहे.