Maharashtra Rain : मान्सूनोत्तर हंगामातील पहिला चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झाल आहे. या चक्रीवादळाला दाना असे नाव देण्यात आले असून या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. ओडिशाला धडकल्यानंतर या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 120 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहत होते.
तसेच ओडिसाशामधील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस नमूद करण्यात आला. आज सुद्धा ओडिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तथापि आत्तापर्यंत ओडिसा आणि पश्चिम बंगाल राज्यात कोणतीही मोठी हानीची घटना झालेली नाही ही एक मोठी दिलासादायक बाब आहे.
या चक्रीवादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी विजेचे खांब पडते झाले आहेत, काही भागात घरांचेही नुकसान झाले आहे. मात्र या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नसून ही एक मोठी दिलासा ची बाब आहे.
दरम्यान आता याच वादळा संदर्भात एक मोठे अपडेट हाती येत आहे. पश्चिम बंगालवर धडकलेल्या ‘दाना’ या चक्रीवादळाचा परिणाम राज्यासह मुंबईवर होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे आहे.
चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ऐन दिवाळीच्या काळात पाऊस पडू शकतो असे बोलले जात आहे. खरे तर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू होता. राज्यात जवळपास चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस झाला.
पावसाचे प्रमाण राज्यात एवढे अधिक होते की अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद करण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेकांच्या माध्यमातून यंदा दिवाळीतही पाऊस पडणार का असा सवाल उपस्थित होत होता.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने यंदाच्या दिवाळीत राज्यासह मुंबईत थंडीऐवजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. दिवाळीच्या काळात दाना चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात विशेषता सायंकाळच्या वेळी पाऊस पडणार.
येत्या दोन दिवसांनी अर्थातच 27 ऑक्टोबर पासून ते एक नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्राची राजधानी मुंबई सह संपूर्ण राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या राज्याचे वातावरण थंड राहणार असे म्हटले जात आहे मात्र विशेष थंडी जाणवणार नाही असेही हवामान अभ्यासाकांनी स्पष्ट केले आहे.
येत्या सोमवार नंतर म्हणजेच ऐन दिवाळीच्या काळात मुंबईसह संपूर्ण राज्यात ऐन सायंकाळच्या वेळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान यंदा 15 नोव्हेंबर नंतरच राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असा अंदाज दिला जातोय.