Maharashtra Rain : भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात आजपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असा अंदाज नुकताच जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतलीय यामुळे शेती कामांना वेग आला आहे. रब्बीच्या पेरण्या मानसून नंतर सुरू झालेल्या पावसामुळे खोळंबल्या होत्या.
पण आता गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने राज्यातील बहुतांशी भागांमधील रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अशातच भारतीय हवामान खात्याने आजपासून पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याचा नवीन अंदाज दिला आहे.
अर्थातच ऐन दीपोत्सवाच्या काळात यावर्षी पावसाची हजेरी लागणार आहे. आय एम डी ने आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच एक नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात पाऊस पडत राहणार असा अंदाज दिला आहे. पावसाचा जोर फारसा अधिक राहणार नाही मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असे बोलले जात आहे.
या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे फारसे नुकसान होणार नाहीये परंतु शेती कामांचे नियोजन चुकू शकते. यामुळे या पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी आपल्या शेती कामांचे नियोजन आखावे. तसेच वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांनी अधिक सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोण कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे?
पुणे वेध शाळेने उद्या अर्थातच ३० तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, संभाजी नगर, जालना परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असे म्हटले आहे.
तसेच, ३१ तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असून 30 आणि 31 ऑक्टोबरला या संबंधित जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
1 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पाऊस
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड या जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याची सुरुवात पावसाने होणार असा अंदाज IMD ने दिलाय.