Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी कामाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसा संदर्भात. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात 11 ते 13 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे.
खरे तर गेल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपीट झाली होती. त्यावेळी राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान आता एप्रिल महिन्यातही पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सत्र चालू झाल्याचे पाहायाला मिळाले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे वाढत्या उकाड्याने अन उन्हाने व्याकुळ झालेल्या जनतेला निश्चित दिलासा मिळाला आहे.
राज्यातील तापमान काही ठिकाणी 43°c पर्यंत पोहोचले होते. अशातच ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी पाऊस झाल्याने तापमानात काहीशी घट आली आहे. पण, वादळी पावसामुळे रब्बी हंगामातील हार्वेस्टिंगसाठी तयार झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काढणीला आलेल्या कांदा पिकाचे विदर्भातील हळद पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी आधीच नैसर्गिक संकटांमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांना आणखी एक मोठा फटका बसला आहे. अशातच IMD कडून 11 ते 13 एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेली माहितीनुसार, 11 एप्रिलला विदर्भातील वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात गारपीट होऊ शकते. या पार्श्वभूमीवर या संबंधित 6 ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
तसेच गारपीटीची शक्यता लक्षात घेता पशुधनाची देखील अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. याशिवाय, विदर्भातील उर्वरित जिल्हे आणि मराठवाडा विभागातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोबतच उद्या मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. एवढेच नाही तर अकरा तारखेला राज्यातील मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक, जवळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच 12 तारखेला विदर्भातील वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय विदर्भ आणि संपूर्ण मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार असे IMD ने म्हटले आहे.
विशेष म्हणजे 13 तारखेला देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे शक्यता असल्याचे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. एकंदरीत आगामी काही दिवस पावसाची शक्यता कायम राहणार असे हवामान खात्याने यावेळी स्पष्ट केले आहे. मात्र याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो.