Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले असून यामुळे उकाडा वाढला आहे.
विशेष बाब अशी की, भारतीय हवामान खात्याने आज देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना आज हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. विशेष म्हणजे कोकणात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, दक्षिण कर्नाटकपासून कोकण, मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा एक पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे.आज देखील आजच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारता ढगाळ हवामान होत असून मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस होत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांच्या काळात विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपीट झाली.
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आणि खानदेश मधील जळगाव जिल्ह्यातील काही भागात गारपीटीची हजेरी पाहायला मिळाली आहे. याशिवाय मध्ये महाराष्ट्रातील नासिक आणि अहमदनगर मध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी लागली आहे.
दरम्यान हवामान खात्याने आज अर्थातच 29 फेब्रुवारी 2023 रोजी मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा जारी केला आहे.
एवढेच नाही तर हवामान खात्याने कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. नासिक, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी आज हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.