Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर आणि विदर्भात पावसाची तीव्रता अधिक पाहायला मिळाली. उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचे प्रमाण खूपच अधिक होते.
उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, धुळे या जिल्ह्यांमध्ये काही भागात अक्षरशा परिस्थिती तयार झाली. नदी नाल्यांना पूर आले. धरणांच्या जलाशयात पाण्याची आवक वाढली. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.
सर्वत्र श्रावण सरींसारखा पाऊस पडत आहे. जोरदार पाऊस सध्या गायब असल्याचे दिसते. पण, भारतीय हवामान खात्याने आज पासून 30 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
कुठं बरसणार मुसळधार पाऊस
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा विभागाचा काही भाग वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज 28 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट पर्यंत जोरदार पाऊस होणार आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, आज मध्य महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात विशेषता घाटमाथा परिसरावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दक्षिण कोकणातील रायगड मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर ( विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा परिसर ) विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित 13 जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 29 आणि 30 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
30 ऑगस्ट रोजी दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. 29 ऑगस्टला मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.