Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे मौसमी पावसा संदर्भात. भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असा अंदाज दिला आहे. खरे तर गेल्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्याच्या शेवटी मोसमी पावसाने थोडा काळ विश्रांती घेतली होती.
अनेक ठिकाणी पावसाची उसंत पाहायला मिळाली. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू लागला आहे. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
विशेष बाब म्हणजे आजही भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
कुठं बरसणार जोराचा पाऊस ?
आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. खरे तर, दरवर्षी श्रावण महिन्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत असतो, श्रावणसरी बरसत असते. पण यंदाच्या श्रावणाची सुरुवात जोरदार पावसाने होणार आहे.
कारण की, भारतीय हवामान खात्याने आज राज्यातील मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, आज मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
प्रामुख्याने जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यासाठी आज आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय आज मुंबईसह संपूर्ण कोकण, पुणे नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी झाला आहे.
तसेच आज विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशात सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला.
परंतु ऑगस्ट महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कमी पावसाची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये राज्यातील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज समोर आला आहे.
तथापि कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस पडू शकतो असेही आयएमडीने आपल्या बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.