Maharashtra Rain : यंदा महाराष्ट्रात मान्सूनचे वेळेआधीच आगमन झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण आता गेल्या सात दिवसांपासून मान्सूनचा प्रवास रखडला आहे. यामुळे राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या एका आठवड्यापासून महाराष्ट्रात फक्त ऊन पावसाचा खेळ सुरू आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागला आहे. पावसाचा हा लहरीपणा शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे. अशातच, आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस राज्यातील काही भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सदर विभागासाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की 12 जूनला मान्सून महाराष्ट्रातील खानदेश विभागातील जळगाव आणि विदर्भ विभागातील अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत पोहचला होता.
मात्र तेव्हापासून मान्सूनची कोणतीचं प्रगती झालेली नाही. आज देखील मान्सूनची सीमा खानदेशातील जळगाव आणि विदर्भ विभागातील अमरावती, चंद्रपूर पर्यंत पाहायला मिळाली आहे.
मात्र मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून लवकरच राज्यातील काही भागात पुन्हा एकदा मान्सूनची प्रगती पाहायला मिळणार आहे.
दरम्यान पुढील चार दिवस राज्यातील कोकण आणि विदर्भ विभागात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही विभागातील जिल्ह्यांसाठी पुढील चारही दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच उद्या नंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पाऊस हजेरी लावू शकतो असा अंदाज आयएमडीच्या माध्यमातून यावेळी समोर आला आहे.
एकंदरीत राज्यात आता पावसाची तीव्रता वाढणार आहे. विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार असे म्हटले जात आहे. त्यामुळे नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.