Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. यामुळे पावसाच्या लहरीपणाचा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. खरे तर गेल्या वर्षी मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला.
कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान रब्बी हंगामातून तरी बऱ्यापैकी उत्पादन मिळणार अशी आशा होती.
मात्र रब्बी हंगाम जसा सुरू झाला आहे तशी शेतकऱ्यांमागे संकटाची मालिका सुरु आहे. एका मागून एक येणारी संकटे शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहेत.
खरे तर यंदा रब्बी हंगामात कमी पावसामुळे अनेक ठिकाणी पेरणी झालेली नाही. ज्या ठिकाणी चांगला पाऊस होता तसेच शाश्वत पाण्याची उपलब्धता होती तिथेच फक्त पेरणी झाली आहे.
मात्र रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर अन डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसला. शिवाय या चालू वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली.
अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे साहजिकच रब्बी मधल्या पिकांचे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
या संकटातून काही शेतकऱ्यांनी अधिकचा खर्च करत पिके पुन्हा एकदा उभी केली आहेत. मात्र आता पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचे ढग तयार झाले आहेत.
एकीकडे राज्यासहित देशातील अनेक भागात थंडीचा जोर वाढत असतानाच आता राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये आगामी काही दिवस पाऊस बरसणार आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार असे आय एम डी ने स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे राज्याच्या उर्वरित भागात थंडीचा जोर कायम राहणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांचे विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.