Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसासाठी देव नवसला जात होता. देवाकडे मुसळधार पावसासाठी विनवणी केली जात होती.
अनेक ठिकाणी तर पावसासाठी होम हवन देखील केले जात होते. दरम्यान शेतकऱ्यांची ही विनवणी देवाने मान्य केली आहे. आता महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसाच्या खंडानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून याच्या प्रभावामुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळाला आहे.
विशेष म्हणजे या कालावधीत काही भागात मुसळधार पावसाची देखील नोंद करण्यात आली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. हवामान विभागाने येत्या तीन ते चार तासात महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आगामी तीन ते चार तासात राज्यातील 13 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने म्हटल्याप्रमाणे, येत्या चार तासात राजधानी मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे आणि दक्षिण कोकणातील रायगड या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त खानदेश मधील जळगाव, धुळे, या जिल्ह्यातही पाऊस पडणार असा अंदाज आहे. तसेच मराठवाडा विभागातील हिंगोली, लातूर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये देखील काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता यावेळी हवामान विभागाने वर्तवली आहे.
तसेच पुढच्या तीन ते चार तासांमध्ये उत्तर कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, मराठवाड्यातील परभणी, जालना, उस्मानाबाद, दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये येत्या तीन ते चार तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.