Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल झाला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान नमूद केले जात आहे.
शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास यामुळे हिरावला गेला आहे. द्राक्ष आंबा केळी पपई यांसारखे फळपीक बागायतदार यामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाले आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान या निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा झाले आहे.
हे पण वाचा :- पुणे, अमरावतीकरांसाठी खुशखबर ! प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, पहा…..
दरम्यान राज्यात आज देखील मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवली जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने राज्यात पाऊस कोसळत आहे. आज देखील राज्यातील विविध भागात वादळी पावसाची शक्यता आयएमडीच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
विशेष बाब अशी की आज राज्यातील काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असून संबंधित जिल्ह्यांना आयएमडीने येलो अलर्ट जारी केला आहे.
हे पण वाचा :- पांढर सोन चमकल ! कापूस दरात वाढ; कापूस 10 हजाराचा टप्पा गाठणार का? दरवाढ होणार का? पहा काय म्हणताय तज्ञ
एकंदरीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अशा परिस्थितीत संबंधित जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी विशेष सजग राहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची तसेच पशुधनाची यावेळी काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तविक शेतकऱ्यांचे गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळेही मोठे नुकसान झाले आहे.
पण या महिन्याचे सुरुवातीचे दोन दिवस हवामान कोरडे असल्याने आता तरी पाऊस उघडीप देईल आणि अवकाळी मधून बचावलेले पिके पदरात घेता येतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र नियतीला काही औरच मान्य होते. आता गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा बेजार झाल्याचे चित्र आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ ठिकाणी विकसित होणार नवीन केबल स्टेड ब्रिज, वाचा याविषयी सविस्तर माहिती