Maharashtra Rain Alert : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट आली होती.
यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहूल लागली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात किमान आणि कमाल तापमानात थोडीशी वाढ झाली आहे.
मात्र असे असले तरी अजूनही सकाळी-सकाळी वातावरणात गारठा पाहायला मिळत आहे. राज्यात थंडीची चाहूल लागली आहे परंतु थंडीची तीव्रता अजूनही पाहायला मिळालेले नाही. कारण की दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत.
अशातच आता राजधानी मुंबई सह राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचे वृत्त हवामान विभागाच्या हवाल्यातुन समोर येत आहे. हवामान खात्याने याबाबत माहिती दिली आहे.
यामुळे महाराष्ट्रातील जनतेला आगामी काही दिवस हिवसाळा अनुभवायला मिळणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आगामी दोन दिवस राजधानी मुंबईसह कोकणातील किनारी भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्राकडे येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला असल्याने पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. मुंबई आणि कोकणच्या किनारी भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज आहे.
पण पावसाचा जोर हा खूपच कमी राहणार आहे. या कालावधीत हलका पाऊस पडणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. दरम्यान पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे असे आव्हान जाणकार लोकांनी केले आहे.
कोकणातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार ?
राजधानी मुंबई आणि दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सऱ्या बरसणार आहेत. यामुळे संबंधित भागातील नागरिकांना पुन्हा एकदा पावसाळी हवामान अनुभवायला मिळणार आहे.
उर्वरित महाराष्ट्रात मात्र आगामी दोन दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असा अंदाज आहे. एकंदरीत राज्यातील हवामानात हा एक मोठा चेंज आला आहे. शिवाय हवामान खात्याने नोव्हेंबर महिन्यात यावर्षी किमान आणि कमाल तापमान थोडेसे अधिक राहणार असे सांगितले आहे.
यामुळे कडाक्याच्या थंडीला यावर्षी थोडी उशिराने सुरुवात होऊ शकते असे मत व्यक्त होत आहे. दिवाळीनंतर राज्यातील थंडीची तीव्रता वाढेल असे काही हवामान तज्ञांनी याआधीच स्पष्ट केले आहे.