Maharashtra Rain : जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. यानंतर जुलै महिन्याची सुरुवात झाली. जुलै महिन्याचा पहिला आठवडा तर जवळपास कोरडाच केला. यामुळे शेतकऱ्यांची चिंता मोठी वाढली होती. पण, जुलैचा पहिला आठवडा कोरडा गेल्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला.
राज्यातील मराठवाडा विभागातील बहुतांशी महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. यानंतर मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर थोडा कमी झाल्याचे पाहायाला मिळाले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने उघडीप दिली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे यात शंकाच नाही मात्र अजूनही असे अनेक जिल्हे आहेत जिथे जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे पुढील पाच दिवस राज्यात पावसाची धुवाधार बॅटिंग होणार आहे. मुंबई, मुंबई उपनगर, कोकण किनारपट्टी तसेच घाटमाथ्यावर पुढील पाच दिवस जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई सह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरातील जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला.
यानंतर जुलै ची सुरुवात ही निराशा जनक राहिली. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला असल्याने बळीराजाने सुटकेचा निश्वास घेतला आहे.
मध्यंतरी दोन-तीन दिवस पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतली होती मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तसेच दक्षिण महाराष्ट्रात चांगला जोराचा पाऊस पडत आहे.
मराठवाडा आणि विदर्भात ही काही ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होत आहे. विशेष बाब अशी की पुढील पाच दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी 14 ते 18 जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तिथे जसा पाऊस पडत आहे त्यापेक्षा जोरदार पाऊस पडणार असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. अर्थातच उद्यापासून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. यामुळे नक्कीच जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.