Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासहित देशातील काही राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रात मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
प्रामुख्याने काढण्यासाठी तयार झालेल्या भात पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. कोकणातील आणि विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले आहे.
मात्र रब्बी हंगामासाठी हा पाऊस पोषक राहणार असाही अंदाज आहे. यामुळे अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे तर काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
यामुळे मुंबई सह कोकणात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागांमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान कायम आहे.
विशेष म्हणजे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 24 तास राज्यातील कोकण विभागात अवकाळी पाऊस पडण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे. आगामी 24 तास कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर कोकणातील नागरिकांना पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एकंदरीत सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे ऐन दिवाळीच्या काळात महाराष्ट्रातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे.
आता आगामी 24 तास दक्षिण कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज IMD ने दिला आहे.
या काळात कोकण, गोवा, उत्तर कर्नाटकच्या काही भागात पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाने आता राज्यातील किमान आणि कमाल तापमानात हळूहळू घट होणार असे सांगितले आहे.
त्यामुळे आता आगामी काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा गुलाबी थंडीची चाहूल लागणार आहे. पण थन्डीची तीव्रता डिसेंबर महिन्यातच वाढेल असे काही हवामान तज्ञांनी स्पष्ट केले आहे.