Maharashtra Rain Alert : या चालू नवीन वर्षाची सुरुवात अवकाळी पावसाने झाली. नवीन वर्षात अगदी सुरुवातीलाच अवकाळी पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पुन्हा एकदा गळा घोटला गेला. खरे तर, गेल्यावर्षी मान्सून काळात पुरेसा पाऊस झाला नाही.
सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली. गेल्या वर्षाची एंडिंग देखील अवकाळी पावसाने झाली.
ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान कोरडे बनले आहे.
राज्यासह देशातील अनेक भागात थंडीचे तीव्रता देखील वाढत आहे. मात्र अशातच पुन्हा एकदा हवामान आता एक चेंज आला आहे.
बांगलादेशवर एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रसह देशातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता देण्यात आली आहे.
22 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.महाराष्ट्रासोबतच देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
22 ते 24 जानेवारी या कालावधीत राज्यातील विदर्भ विभागात पावसाचा अंदाज देण्यात आला असून या कालावधीत या विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने अवकाळी पाऊस बरसणार आहे.
तर दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता वाढणार आहे. उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट कायम राहणार असून दक्षिणेकडे पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे.
यामध्ये आपल्या राज्यातही अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला असल्याने शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
एकंदरीत, राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पुन्हा एकदा नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.