Maharashtra Rain Alert : आज नववर्षाचा पहिला दिवस. आज पासून 2024 ला सुरुवात झाली आहे. मात्र या नवीन वर्षाची सुरुवात महाराष्ट्रात अवकाळी पावसाने होणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून समोर आला आहे.
खरे तर नोव्हेंबर महिन्याची एंडिंग अवकाळी पावसाने झाली आणि यानंतर डिसेंबर महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली. डिसेंबर महिन्याची एंडिंग सुद्धा अवकाळी पावसानेच होणार असा अंदाज होता.
मात्र असे काही झाले नाही, गेल्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे पाहायला मिळाले. आता मात्र नवीन वर्षाची सुरुवातच अवकाळी पावसाने होणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार अवकाळी पाऊस
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, एक ते सात जानेवारी दरम्यान राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ विभागात ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
या विभागातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहणार आहे तसेच काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडणार असा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 17 जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 5 जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची आणि काही भागात तुरळक हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे या कालावधीमध्ये राज्यातील मराठवाडा विभागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज देण्यात आला आहे. निश्चितच मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील शेतकऱ्यांची यामुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे.
या अवकाळी पावसाचा रब्बी हंगामातील वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना फटका बसू शकतो आणि यामुळे सध्या शेतकरी बांधव चिंतेत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.