Maharashtra Rain 2023 : येत्या नऊ दिवसात गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. 19 सप्टेंबर पासून यंदाचा गणेशोत्सवाचा पर्व सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या सणाला नागरिकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या माध्यमातून अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर भारतीय रेल्वेने देखील कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे यंदाचा गणेशोत्सव शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण की, यंदाच्या गणेशोत्सवात मोठा पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. खरंतर दरवर्षी गणेशोत्सवाला पावसाची हजेरी लागतेच. यावर्षी देखील गणेशोत्सवाला पावसाची हजेरी लागणार असे बोलले जात होते.
शेतकऱ्यांना देखील यंदा गणेशोत्सवात पाऊस पडू शकतो असे वाटत आहे. दरम्यान पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजात यावर्षी १९ सप्टेंबरच्या सुमारास म्हणजे गणेशोत्सवाच्या अगदी सुरुवातीला राज्यात मोठा पाऊस पडू शकतो असे सांगितले आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित अंदाजानुसार, राज्यात 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे.
मात्र जोरदार पावसाला सुरुवात होणार ते 16 सप्टेंबर नंतर. 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान राज्यातील बहुतांशी भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणजेच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर यंदा मोठा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या कालावधीत राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी लागेल आणि काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल असा अंदाजही पंजाबरावांनी बांधला आहे.
एवढेच नाही तर या कालावधीत पडणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील काही प्रमुख धरणाच्या पाण्याच्या साठ्यात देखील वाढ होणार असे त्यांनी सांगितले आहे. या कालावधीत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील मांजरा, उजनी आणि जायकवाडी या तीन भागातील तीन महत्त्वाच्या धरणात पाण्याची मोठी आवक होणार असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
महाराष्ट्रात जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात खूपच कमी पाऊस पडला असल्याने या चालू सप्टेंबर महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात मोठा पाऊस पडण्याची आवश्यकता आहे. दरम्यान पंजाबरावांनी येत्या काही दिवसात महाराष्ट्रात पुन्हा मोठा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे आता त्यांचा हा अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो यात शंकाच नाही.