Maharashtra Railway : भारतीय रेल्वेचा प्रवास गेल्या काही वर्षांमध्ये खूपच सोयीचा झाला आहे. रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून आम्ही शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न झाले आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता देशात वंदे भारत एक्सप्रेस सारखी हाय स्पीड ट्रेन सुरू झाली आहे. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली.
सध्या स्थितीला ही गाडी देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. आपल्या राज्याला सुद्धा आठ वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. विशेष म्हणजे नजीकच्या भविष्यात महाराष्ट्राला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
अशातच मात्र राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी मध्य महाराष्ट्रातील तथा मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेने पनवेल ते नांदेड दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी सुट्ट्यामुळे या मार्गावर होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वेने पनवेल ते नांदेड दरम्यान विशेष गाडीच्या चाळीस फेऱ्या सोडणार असल्याचे जाहीर केले आहे.
पनवेल-हुजूर साहेब नांदेड या विशेष एक्सप्रेसच्या 20 फेऱ्या आणि नांदेड पनवेल विशेष एक्सप्रेसच्या वीस फेऱ्या अशा 40 फेऱ्या होणार आहेत. यामुळे पनवेल ते नांदेड यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या गाडीसाठी आजपासून म्हणजे 20 एप्रिल पासून आरक्षण सुरू होणार आहे. दरम्यान आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नांदेड पनवेल विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक कसे राहणार ?
पनवेल-नांदेड उन्हाळी विशेष गाडी 23 एप्रिल पासून ते 27 जून पर्यंत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.
गाडी मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल येथून 14:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी साडेचार वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. नांदेड पनवेल उन्हाळी विशेष गाडी ही 22 एप्रिल ते 26 जून पर्यंत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी सोमवारी आणि बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून 23:00 वाजता सुटेल आणि 13:25 वाजता ती पनवेल रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कुठं थांबणार गाडी
हाती आलेल्या माहितीनुसार, ही विशेष गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. या ट्रेनला कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, नागरसोल, रोटेगांव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी आणि पूर्णा या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.